बॉलिवूडची ‘क्यूट गर्ल’ म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या आलियाचा १५ मार्च रोजी वाढदिवस. आलिया तिच्या आयुष्यातील हा खास दिवस कोणासोबत साजरा करणार याची चाहत्यांना फार उत्सुकता आहे. ‘राजी’ फेम आलिया भट्टने तिच्या २६व्या वाढदिवसानिमीत्त काही खास प्लॅन केले असल्याची चर्चाही सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटांचे प्रमोशन आणि शुटिंगमध्ये व्यग्र असलेली अभिनेत्री आलिया वेळात वेळ काढून तिचा वाढदिवस बॉयफ्रेंड रणबीर कपूरसह साजरा करणार असल्याचं समजतय. तसेच मित्र करण जोहर आणि अयान मुखर्जी हे देखील सेलिब्रेशनचा भाग असण्याची शक्यता आहे. आलिया तिचा हा वाढदिवस कुठे साजरा करणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सध्या आलिया भट्ट तिचा आगामी चित्रपट ‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि कुणाल खेमू हे देखील चित्रपटात झळकणार आहेत. त्यानंतर तिचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजी’ आणि ‘गली बॉय’च्या यशानंतर आलियाकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या असून तिच्या दमदार अभिनयाची प्रशंसा देखील होऊ लागली आहे. त्याच बरोबर आलियाने नुकताच एस. एस. राजामौलींच्या ‘RRR’ चित्रपटालाही होकार दिला आहे. चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सह अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये सतत चर्चा सुरु असते. सार्वजनिक ठिकाणी किवा इव्हेंटमध्ये हे जोडपं एकत्र फिरताना दिसतं. तसेच आलियाला तिच्या लग्नाबद्दल अनेक वेळा प्रश्नही विचारण्यात आले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt is going to celebrate her 26th birthday with boyfriend or friends
First published on: 14-03-2019 at 13:25 IST