बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. गरोदर असल्याची बातमी दिल्यापासून ती कायमच चर्चेत आहे. सध्या कपूर कुटुंबाकडून आलियाच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी केली जात आहे. या दरम्यान आलिया भट्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ती लवकरच स्वतःचा मॅटर्निटी वेअर ब्रँड सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणाली, “मी लवकरच माझा आणखी एक कपड्यांचा ब्रँड सुरु करणार आहे. यात मॅटर्निटी वेअर मिळणार आहेत. हा ब्रँड विशेषत: आई होणाऱ्या महिलांसाठी असणार आहे.”

आलिया भट्टची इन्स्टाग्राम पोस्ट

“दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड सुरू केला. तेव्हा मला अनेकांनी विचारले होते की, मला मुलं नाही मग मी हे का करत आहे? त्यानंतर आता मी माझा मॅटर्निटी वेअर ब्रँड सुरु करत आहे आणि आता मला कोणी हा प्रश्न विचारेल असे वाटत नाही. पण तरीही मी ते सांगू इच्छिते.

मी यापूर्वी कधीही मॅटर्निटी वेअर खरेदी केलेले नाही. पण आता जेव्हा मी ते खरेदी केले, तेव्हा ते पाहून मला धक्काच बसला. तुम्ही गरोदरपणाच्या त्या नऊ महिन्यात कसे दिसणार आहात, याबद्दल तुम्हाला काहीही कल्पना नसते. त्यात जर तुम्हाला परिधान करणारे कपडे नीट, व्यवस्थित मिळणार नसेल तर ते अधिक त्रासदायक ठरु शकते.

फार स्पष्टपणे सांगायचे झाले तर मी मॅटर्निटी वेअर खरेदी करण्यासाठी गेली असता मला तिथे योग्य कपडे मिळाले नाही. मी परिधान करत असलेल्या ब्रँडचे कपड्यांची साईज अनेकदा जास्त, कमी असायची. त्यामुळे मला फार त्रास व्हायचा. गरोदरपणात माझ्या शरीरात जरी बदल होत असले तरी मला फॅशनबद्दल माहिती नाही, असे होऊ शकत नाही. यामुळेच मी माझे मॅटर्निटी वेअर माझ्या पद्धतीने परिधान करण्याचा निर्णय घेतला.

मी माझ्या आवडीचे अनेक जिन्स, डिझायनर शर्ट्स याला इलास्टिकचा वापर केला जेणेकरुन माझ्या पोटाला काहीही त्रास होऊ नये. तसेच अनेक एअरपोर्ट लूकचाही मी वापर केला. सध्या माझे वॉर्डरोब हे अशाप्रकारच्या कपड्यांनी भरलेले आहे. ज्याची झलक मी तुम्हाला उद्या दाखवेन. मी त्याची झलक दाखवण्यासाठी फार उत्सुक आहे”, असे आलिया म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात आलिया आण रणबीर यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा पुढील भाग २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.