‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या चित्रपटाच्या निमित्ताने नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेले एक गाणे पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित ‘तम्मा तम्मा लोगे’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन थिरकताना दिसत आहेत. आलिया आणि वरुणच्या या नव्या कोऱ्या ‘तम्मा तम्मा लोगे’ या गाण्याने सर्वांनाच भुरळ घातली असताना आता आणखी एक सेलिब्रिटी या गाण्याच्या तालावर थिरकत आहे. तो सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलियाने ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती आणि रणवीर ‘तम्मा तम्मा…’या गाण्याचे आणखी एक व्हर्जन प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अभिनेता रणवीर सिंग पंजाबी लूकमध्ये दिसत असून त्याच्या बोलण्याच्या अंदाजातही पंजाबी झाक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या ‘तम्मा तम्मा’चे हे व्हर्जनही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे असेच म्हणावे लागेल.

दरम्यान, आलिया भट्ट आणि वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असून हे दोन्ही कलाकार बहुविध मार्गांनी चित्रपटाची प्रसिद्धी करत असल्याचे पाहायला मिळतेय. नुकतेच या कलाकार जोडीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह रॅम्प वॉक करत अनेकांचेच लक्ष वेधले होते. राजधानी दिल्लीतही ‘बद्रिनाथ’ आणि त्याची ‘दुल्हनिया’ त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पोहोचले होते.

‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. २०१४ मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरुणाईने हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाबाबतही तरुणाईमध्ये उत्सुकता नक्कीच असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt made ranveer singh dance to her tunes of tamma tamma from badrinath ki dulhania and posts video on twitter
First published on: 28-02-2017 at 10:45 IST