चित्रपट जगतातील सर्वांत मोठा महोत्सव, ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ १३ ते २४ मे यादरम्यान फ्रान्समध्ये होणार आहे. आलिया भट्टचे चाहते खूप उत्सुक होते. कारण- या वर्षी आलिया कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार होती. पण, आता अशा बातम्या येत आहेत की, ज्यामुळे तिचे चाहते निराश होऊ शकतात.

खरे तर, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आलियाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तिची योजना रद्द केल्याचे बोलले जात आहे. आलिया कान्सच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार होती; परंतु ‘मिड डे’च्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द केला. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आलियाने हा निर्णय घेतला. आलियाने तिचा कान्स डेब्यू पुढे ढकलला.

कान्सऐवजी सध्या देशातच राहण्याचा निर्णय

रिपोर्टनुसार, आलियाने सध्या देशातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसे, आलियाला २०२५ च्या कान्स महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहायचे होते. पण, आलियाला वाटते की, सध्या तिला तिच्या देशासाठी उभे राहावे लागेल. अभिनेत्री तिच्या वेळापत्रकानुसार नंतर या महोत्सवात सहभागी होण्याचा विचार करू शकते. या बातमीवर आलिया भट्टची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही उर्वशी रौतेला महोत्सवात दिसली. तसेच दरवर्षीप्रमाणे ऐश्वर्या राय बच्चनही या वेळी तिच्या सौंदर्य आणि स्टाईलने रेड कार्पेटवर एन्ट्री करेल. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री केली. यावेळी तिने मल्टीकलर्ड शोल्डर गाऊन घातला होता. त्याबरोबर तिने क्रिस्टल पॅरट क्लच कॅरी केला होता. तिच्या या लूकची खूप चर्चा झाली. उर्वशीच्या क्लचची किंमत सुमारे ४.५० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आलिया भट्ट शेवटची ‘जिग्रा’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता वेदांग रैनादेखील दिसला होता, ज्याने तिच्या भावाची भूमिका केली होती. त्याशिवाय आलियाकडे आजकाल अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. लवकरच तिचे ‘लव्ह अँड वॉर’ व ‘अल्फा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चाहते आता त्यांच्या रिलीजची वाट पाहत आहेत. आता आलिया खरोखरच कान्स फेस्टिवलमध्ये सहभागी होणार की नाही हे पाहणे रंजक ठरेल.