अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘एबीसीडी २’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी १५ जूनला श्रद्धा दिल्लीमध्ये आली होती. यावेळी चित्रपटातील तिचा सह-कलाकार वरुण धवनसुद्धा उपस्थित होता. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या श्रद्धाने आपल्या हिट चित्रपटांचे गुपित येथे उलगडले. वडील शक्ती कपूर यांनी दिल्लीमध्ये पाहिलेले आपले सर्व चित्रपट हिट झाल्याचे तिने सांगितले. श्रद्धाच्या ‘एबीसीडी २’ चित्रपटच्या प्रदर्शनाच्या तोंडावर शक्ती कपूर दिल्लीत असून, त्यांनी चित्रपटाची तिकिटेदेखील खरेदी केली आहेत. आपल्या मित्रांसोबत ते लेकीचा चित्रपट पाहणार आहेत. या चित्रपटात प्रथमच श्रद्धा एका नर्तिकेची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणादरम्यान नृत्याच्या अवघड स्टेप्स करताना अनेकांना मार लागला, परंतु, आपण यातून बचावल्याचा अनुभव श्रद्धाने कथन केला. तर ‘बेजुबां’ गाण्यादरम्यान वरुणला दुखापत झाल्याची आठवण तिने सांगितली. बॉलिवूडमधील प्रस्थापित अभिनेत्रीमध्ये श्रद्धाची गणना व्हायला लागली असून, तिचा अभिनय असलेल्या ‘एबीसीडी २’ चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अभिनेत्री, गायक आणि नर्तिका असलेल्या श्रद्धाने आतापर्यंत ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘आशिकी २’ चित्रपटांमधून उत्तम कामगिरी केली आहे. ‘एबीसीडी २’ चित्रपटानंतर ती फरहान अख्तरच्या ‘रॉक ऑन २’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2015 रोजी प्रकाशित
वडिलांनी दिल्लीमध्ये पाहिलेले माझे सर्व चित्रपट हिट – श्रद्धा कपूर
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'एबीसीडी २' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी १५ जूनला श्रद्धा दिल्लीमध्ये आली होती.

First published on: 17-06-2015 at 04:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All my films watched by dad shakti kapoor in delhi are a hit shraddha kapoor