ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि गायिका अली सिम्पसनचा मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये तिची मान फ्रॅक्चर झाली आहे. इतकंच नाही तिला करोनाची लागण देखील झाली आहे. ती सध्या रुग्णालयात असून २०२२ ची सुरुवात तिच्यासाठी अशी होईल असा विचार तिने कधी केला नव्हता असं एक पोस्ट शेअर करत तिने सांगितलं आहे.

अलीने तिचा हॉस्पिटमधला फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबत तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. “कधीकधी आपलं आयुष्य एका क्षणात बदलते. २०२२ची सुरुवात माझ्यासाठी चांगली झाली नाही. पहिले माझी मान मोडली आणि दुसरं मी करोना पॉझिटिव्ह आले. थोडक्यात सांगायचं झालं तर मी कमी खोल असलेल्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि माझं डोक पूलच्या तळाला आपटलं. ही नवीन वर्षाची गोष्ट आहे. मी एक्स-रे, सीटी-स्कॅन आणि एमआरआय केले, ज्यामध्ये माझ्या मानेला दोन फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. त्यानंतर मला रुग्णालयात पाठवण्यात आले, इथे न्यूरोसर्जन माझी काळजी घेत आहे. या व्हिडीओत तिने तिचा अपघात कसा झाला ते सांगितलं आहे,” असे अली म्हणाली आहे.

आणखी वाचा : बिडीच्या जाहिरातीवर आपला फोटो पाहून धर्मेंद्र यांनी सांगितले त्यामागचे सत्य

अली पुढे म्हणाली की, “सध्या कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नाही. मला हार्ड नेक ब्रेस लावून घरी पाठवण्यात आले. मला पुढील ४ महिने याला सतत घालून ठेवायचे आहे. आशा आहे की माझी मान लवकर बरी होईल. मी भाग्यवान आहे की मी जिवंत आहे. माझा पाठीचा कणा वाचला.

आणखी वाचा : ‘पंतप्रधानांना जर भेटायची वेळ आली तरी मी…’, बिचुकलेचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीने ही पोस्ट शेअर करत तिच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला आणि तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. अली एक सुत्रसंचालिका, डान्सर आणि गायिका आहे. या व्यतिरिक्त ‘I Am A Celebrity Get Me Out Of Here’ मध्ये अली दिसली आहे.