ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत नचिकेत करणार अप्पांना चॅलेंज

मालिका नव्या वळणावर..

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरत आहे. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली आहे. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने ३५० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की सई नचिकेतच्या भांडणात आता सगळं संपलं आहे असं सई त्याला सांगते आणि त्यामुळे दोघांचं ब्रेक अप होतं. या गोष्टी कळल्यावर अप्पांना खूप आनंद होतो. पण या सगळ्यामागे कोणीतरी आहे हे नचिकेतला कळून चुकत आणि या गोष्टीचा छडा लावायचा नचिकेत ठरवतो.

मालिकेत एक इंटरेस्टिंग ट्विस्ट असा येणार आहे कि सई नचिकेतमध्ये झालेल्या भांडणामागे अप्पाच आहेत हे नचिकेतला लवकरच कळणार आहे. पण हे कळल्यावर नचिकेत मात्र शांत बसणार नाहीये. उलट तो अप्पांना सईला परत मिळवण्याचं चॅलेंज देणार आहे. आता नचिकेत हे चॅलेंज जिंकेल का? अप्पा नचिकेतच्या या चॅलेंजला कसं उत्तर देतील? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Almost sufal sampurnam serial on different mode avb

ताज्या बातम्या