अभिनेता अमेय वाघने मराठीसोबतच हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमधून त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवलीय. अमेय सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. हटके फोटो आणि पोस्ट शेअर करत तो चाहत्यांचं लक्ष केंद्रीत करुन घेत असतो. त्याच्या अभिनयाप्रमाणेच त्याच्या विनोदबुद्दीचं चाहते कौतुक करताना दिसतात. नुकतीच अमेयने अशीच एक हटके पोस्ट शेअर केलीय. त्याच्या या पोस्टवर खास करून अनेक तरुण चर्चा करत आहेत.

अमेय वाघने नुकताच एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असून यात तो सुटाबुटात दिसतोय. याच कपड्यांमधील काही फोटो अमेयने या आधीदेखील शेअर केले होते. हे फोटो ‘अनन्या’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळीचे आहे. तर यावेळी अमेयचा फोटो हटके नसला तरी त्याचं कॅप्शन मात्र खास आहे.

क्रिती सेननला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना, नेटकरी म्हणाले, “ही तर वरपासून खालपर्यंत…”

अमेयने शेअर केलेल्या फोटोत त्याचा नवा लूक आहे. ज्यात त्याची मिशी पाहायला मिळतेय. या खास लूकसाठी त्याने एक भन्नाट कॅप्शन दिलंय. “मिशी आणि रिलेशनशिप यांच्यात खूप साम्य असतं ! आपोआप डेव्हलप होतात पण त्या मेंटेन करणं खूपच अवघड !” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय. पुढे त्याने अमेयचा स्वॅग असा हॅशटॅग दिला आहे.


अमेयच्या या कॅप्शनला त्याचा मित्र अभिनेता अक्षय टंकसाळे तसचं निपुण धर्माधिकारीसह अनेक मित्रांनी पसंती दिलीय. त्याच्या चाहत्यांनी देखील भन्नाट कॅप्शनसाठी त्याचं कौतुक केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेयच्या पोस्टवर एक नेटकरी म्हणाला, “कडक कसलं सुचलय आयुष्यभर मिशा ठेवलेल्या अभिमान वाटेल अस वाक्य.” तर आणखी एक युजर म्हणाला, “काय भन्नाट कॅप्शन टाकता. सुचतं कसं.” अमेय अनेकदा असे हटके कॅप्शन देत असतो.