भारतीय प्रेमी सचिनसाठी पाकिस्तानी महिला सीमा हैदर देशाच्या सीमा ओलांडून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सीमाची सातत्याने चर्चा होत आहे. तिच्यावर गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने तपासही सुरू आहे. अशातच सचिन व सीमाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. दोघांनाही कामासाठी बाहेर जाता येत नसल्याने ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशातच उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा व सचिनला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.

“मला पाकिस्तानात परत पाठवू नका”, सीमा हैदरच्या मागणीवर योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अमित यांनी त्यांचे फिल्म प्रॉडक्शन हाऊस ‘जानी फायर फॉक्स’ या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर सीमा व सचिन या जोडप्याला दिली आहे. अमित जानी यांनी नुकतेच मुंबईत चित्रपट प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. त्याचे नाव ‘जानी फायर फॉक्स’ आहे. उदयपूरमधील शिंपी कन्हैया लाल साहूच्या हत्येवर अमित चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ असे ठेवण्यात आले असून तो नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अभिनय सोडून सन्यास घेणारी अभिनेत्री केदारनाथमध्ये अडकली, हेलिकॉप्टरने केली सुटका; व्हिडीओ आले समोर

अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला ऑफर दिली की जर त्यांनी त्यांच्या प्रॉडक्शनमध्ये काम केले तर ते कामाच्या बदल्यात या जोडप्याला पैसेही देतील. तसचे सीमा हैदर ज्या पद्धतीने भारतात शिरली, त्याचं आपण समर्थन करत नसल्याचं अमित यांनी स्पष्ट केलंय. पण आता त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही अडचण आल्याचं कळाल्यावर त्यांना मदत करणे भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत अमित जानी ‘आज तक’शी बोलताना म्हणाले की दोन दिवसांपूर्वी त्यांनी सीमा हैदरच्या घरी एका सहकाऱ्यामार्फत मेसेज पाठवला होता की ती आमच्या चित्रपटात काम करू शकते. ‘मी विचार करून सांगेन’ असे उत्तर सीमाने दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत तिच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेले नाही.