काही दिवसांपूर्वी ‘मणिके मागे हिथे’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्याने नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांन वेड लावलं आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तर हे गाणं रात्री लूपवर ऐकलं असे त्यांनी सांगितलं आहे. हे गाणं योहानीने गायलं आहे. योहानी कोण आहे? असा प्रश्न सगळ्या नेटकऱ्यांना पडला आहे. आज आपण योहानी कोण आहे हे जाणून घेणार आहोत.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या गायिकेला पाहून नेटकऱ्यांना वाटते की योहानी ही दाक्षिणात्य गायिका आहे. मात्र, ही गायिका भारतीय नसून श्रीलंकेची आहे. तिचं सोशल मीडियावर जे गाणं व्हायरल झालं आहे. ते गाणं तामिळ किंवा मल्याळम भाषेत नाही तर सिंहला भाषेत आहे. योहानीचे भारतात लाखो चाहते आहेत. यात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देखील समावेश आहे. हे गाणं शेअर करत अमिताभ यांनी तिची स्तुती केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी हे गाणं रात्रभर लूपवर ऐकल्याचे त्यांनी सांगितले आहे.

योहानीच पूर्ण नाव योहानी दिलोका डिसिल्वा आहे. तिचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ३० जुलै १९९३ साली झाला. योहानीने २०१६ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात युट्यूबर एक गाणं शेअर करत केली होती. तिची गाणी आणि रॅप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागले. आता श्रीलंकेत योहानीला रॅप प्रिंसेस असा खिताब देण्यात आला आहे.

आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?

शाळेत असताना योहानी एक प्रोफेशनल जलतरणपटू आणि वॉटर पोलो खेळाडू होती. शाळा सोडल्यानंतर योहानीने अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. योहानीने लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट अँन्ड प्रोफेशन्ल अकाऊंटिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने गायणात तिचे करिअर केले.

आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा

जे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे ते गाणं याच वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला ३ महिन्यात ७ कोटींपेक्षा जास्त लोकांनी तिच्या गाण्याचा हा व्हिडीओ पाहिला आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतात असलेल्या तिच्या चाहत्यांनी तिच्याकडे मागणी केली की या गाण्याचे तामिळ आणि मल्याळम व्हर्जन आम्हाला पाहायचे आहे. त्यानंतर २६ जुलैला तिने या गाण्याचे तामिळ आणि मल्याळम व्हर्जन प्रदर्शित केले.