सेलिब्रिटींकडे अनेकदा ब्रँड म्हणून पाहिलं जातं. त्यांचं काम, वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहार, सोशल मीडियावरील प्रतिमा या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची ‘ब्रँड व्हॅल्यू’ ठरते. जपानधील प्रसिद्ध रकुतेन Rakuten या एजन्सीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं असून त्यातून विविध सेलिब्रिटींना त्यांच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’नुसार किताब मिळाला आहे. TIARA रिसर्चनुसार, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे भारतातील सर्वांत विश्वसनीय व आदरणीय सेलिब्रिटी ठरले आहेत. तर अभिनेत्री आलिया भट्ट ही सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी ठरली आहे. फक्त सिनेमाच नाही तर क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचाही या यादीत समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय ज्या सेलिब्रिटीला सर्वाधिक ओळखतात, तो ठरला आहे आयुषमान खुराना. त्याच्या मागोमाग विकी कौशल आणि कतरिना कैफचा क्रमांक आहे. सर्वांत वादग्रस्त सेलिब्रिटी कपल ठरलंय आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. तर क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सर्वांत वादग्रस्त सेलिब्रिटी ठरला आहे.

२३ शहरांतील ६० हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. एकूण १८० सेलिब्रिटींना विविध किताब त्यात देण्यात आले. त्यातील निवडक यादी पुढीलप्रमाणे-

India’s Most Respected: अमिताभ बच्चन</p>

Celebrity India Identifies with the most: आयुषमान खुराना

India’s Most Appealing: अक्षय कुमार</p>

India’s Most Controversial: हार्दिक पांड्या

India’s Most Attractive: आलिया भट्ट

India’s Most Trendy: विराट कोहली

India’s Most Beautiful: दीपिका पदुकोण

India’s Most Versatile: नवाजुद्दीन सिद्दीकी

India’s No 1 Heartthrob: रणबीर कपूर

India’s Most Seductive: राधिका आपटे

India’s Most Sexy: प्रियांका चोप्रा

India’s Most Down to Earth: महेंद्रसिंह धोनी

India’s Most Reliable: सायना नेहवाल

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan is the most respected and alia bhatt the most attractive celebrity ssv
First published on: 27-10-2020 at 10:12 IST