बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या चार दशकापासून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. अमिताभ यांनी १८० हून अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे. अमिताभ हे भारतीय चित्रपट इतिहासातील महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ यांनी एकदा कॉलेजच्या जीवनामधील एक किस्सा जाणून घेणार आहोत.

अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपति ११’मध्ये हा किस्सा सांगितला होता. अमिताभ हे दिल्लीला शिक्षण घेत असतानाचा हा किस्सा आहे. कॉलेजचे शिक्षण घेत असताना अमिताभ दिल्लीमधील तीन मूर्ती येथे राहत होते आणि कॉलेजला जाण्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागत असे. ही बस कनॉटप्लेस (सीपी) मार्गाहून त्यांना यूनिवर्सिटीला सोडत असे. ‘या रस्त्यात खासकरुन सीपीपासून आयपी कॉलेजपर्यंत, मिरांडा हाउसला जाणाऱ्या सुंदर कॉलेजच्या मुली बसमध्ये चढत असत. आम्ही या बसस्टॉपवर सुंदर मुलींची बसमध्ये चढण्याची वाट पाहायचो,’ असे अमिताभ यांनी सांगितले होते.

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

आणखी वाचा : अमिताभ नाही तर ‘हे’ आहे बिग बींच खरं नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘काही वर्षांनंतर माझे पदवीधर शिक्षण पूर्ण झाले आणि मी नोकरी करु लागलो. दरम्यान,माझी ओळख त्या बसमध्ये चढणाऱ्या एका सुंदर मुलीशी झाली. त्या मुलीनी मला एक मजेदार गोष्ट सांगितली. जेव्हा तुम्ही यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेत होतात त्यावेळी तुमची एक झलक पाहण्यासाठी आम्ही सगळ्या वाट पाहात बसायचो. ती दररोज तिचा मैत्रिणींसोबत मला पाहण्यासाठी त्या बसस्टॉपवर येत होती,माझी वाट पाहत’ असे अमिताभ पुढे म्हणाले.