बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर आज (१ एप्रिल) सर्वांना एप्रिल फूल करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांनी आपण ट्विटरला बाय बाय करणार असल्याचे ट्विट केले आहे. अनुपम खेर हे ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव असतात. आपल्या चाहत्यांशी आणि सहकलाकारांशी संवाध साधण्यासाठी ते या सोशल साइटचा वापर करतात. तसेच, त्यांनी ट्विटरद्वारे पत्नी किरण खेर यांचा प्रचारही करण्यास सुरुवात केली आहे. किरण खेर या भाजपसाठी चंदीगढ येथील मतदारसंघातून उभ्या राहिल्या आहेत.
अनुपम यांनी आपण ट्विटरवर “फायनली माय बाय बाय टू ट्विटर”, असे ट्विट केले खरे, पण त्यांचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एप्रिल फूलचा खुलासा केला. अमिताभ यांनी ट्विट केले की, “नो उल्लू बनाइंग अनुपम!”
यापूर्वी अजय देवगण, शाहरुख खान, अनुराग कश्यप यांनी नकारात्मक प्रसिद्धीमुळे ट्विटवरून काढता पाय घेतला होता. मात्र, शाहरुख आणि अजय देवगण हे पुन्हा ट्विटवर आले आहेत. तर, अनुराग कश्यपने ट्विटवरूनपासून लांब राहणेच पसंत केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
अमिताभ अनुपम खेरला म्हणाले, ‘नो उल्लू बनाइंग’
बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर आज (१ एप्रिल) सर्वांना एप्रिल फूल करण्याच्या मनस्थितीत आहेत.

First published on: 01-04-2014 at 02:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan says no ullu banaoging to anupam kher for april fools joke