सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जेथे सर्व सामन्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण बिनधास्तपणे मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारे यूजर्सचे ताज्या घडामोडींपासून ते कलाकारांच्या पोस्टपर्यंत अनेक ठिकाणी नजर असते. असेच काहीचे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडले आहे. एका यूजरने बिग बींच्या जाहिरातीमधील चक्क चूक शोधून काढली आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकताच एका जाहिरातीसाठी शूट केले आहे. या जाहिरातीच्या एका फोटोमध्ये ते मॉडेलच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहेत. पण तो हात बिग बींचा नसून फोटोशॉप केल्याचे दिसत आहे. एक यूजरने ही चूक दाखवून दिली आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.
आणखी वाचा: “आधी व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…,” महिमा चौधरीचा धक्कादायक खुलासा

एका यूजरने या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘अशी चाणाक्ष नजर प्रत्येकाकडे नसते’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसऱ्या एका यूजरने ‘कुणी बारकाईने पाहिले आहे का या फोटोमधील वडिलांचा हात किती लांब आहे. हा फोटो यासाठी की ही एक अभिनेत्री नाही आणि बिग बींना तिच्यासोबत पोझ देण्याची इच्छा नाही. पण फोटोशॉपसाठी १० पैकी १ गूण’ या आशयाचे ट्वीट केले आहे. तिसऱ्या एका यूजरने तो हात कुणाचा आहे असा प्रश्न विचारला आहे.