Anant Ambani Radhika Merchant Sangeet Video: अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. बुधवारी मामेरू कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या जोडप्याच्या संगीतला अख्खं बॉलीवूड अवतरलं होतं. तसेच काही राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या मुलीसह अनंत-राधिकाच्या संगीतला पोहोचल्या.

शुक्रवारी मोठ्या थाटामाटात अनंत- राधिकाचा संगीत सोहळा पार पडला, या सोहळ्यात जस्टिन बीबरने परफॉर्मन्स दिला. यासह अनेक बॉलीवूड स्टार्सही मंचावर थिरकले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच अमृता फडणवीस व त्यांची लेक दिविजा फडणवीस यांचा व्हिडीओ चर्चेत आहे.

गरबा नाईट, शिव पूजा ते सात फेरे! १४ जुलैपर्यंत असतील अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम, कोणते समारंभ कुठे होणार?

अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस यांनी अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी मुंबईतील बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हजेरी लावली. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी अमृता फडणवीस यांनी हिरव्या रंगाचा पोशाख निवडला होता. या इंडो- वेस्टर्न ड्रेसमध्ये त्या सुंदर दिसत होत्या. तर त्यांची मुलगी दिविजा हिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. दोघींनी जवळपास सारखेच ड्रेस घातले होते व लूकही सारखाच केला होता. अमृता व दिविजा यांचा या कार्यक्रमातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

‘टिप टिप बरसा पानी’मध्ये अक्षय कुमारला किस करायला तयार नव्हती रवीना टंडन; कारण ऐकून दिग्दर्शक म्हणाले, “तुझ्या बाबांना…”

दरम्यान, अमृता फडणवीस व दिविजा यांनी अनंत- राधिकाच्या पहिल्या प्री- वेडिंग सोहळ्यालाही हजेरी लावली होती. दोघीही मायलेकी जामनगरच्या तीन दिवसांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात धमाल करताना दिसल्या होत्या. त्यानंतर आता संगीत समारंभात त्यांच्या ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचे लग्न १२ जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजता आहे. लग्नाचे फेरे अँटिलिया येथे होणार आहेत. यानंतर १३ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. मग १४ जुलै रोजी जंगी रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात येईल.