अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे. दिवालीच्या पार्श्वभूमीवर त्या हे गाणं रिलीज करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे. याबाबतची माहिती अमृता यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

अमृता यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर करत या गाण्याची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत या गाण्यात सोनू निगम असल्याची माहिती अमृता यांनी दिली आहे. महालक्ष्मीची आरती लवकरच प्रेक्षकांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या असून या आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलं आहे. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे.

आणखी वाचा : Sacred Games: नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडू कोसळलं, कुब्रा सैतने केला खुलासा

आणखी वाचा : रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’मधून रणवीरचा सीन कापण्याची दिली धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणा-या अमृता यांचे लाखो चाहते आहेत. त्या नेहमीत सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील त्या बेधडकपणे वक्तव्य करतात. अमृता या बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोल केल्याचं देखील दिसून आलं आहे. अमृता यांना अगोदरच्या अनेक गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामाना करावा लागला आहे.