रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’मधून रणवीरचा सीन कापण्याची दिली धमकी

रोहितने ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने रणवीरला ही धमकी दिली आहे.

rohit shetty, ranveer singh, sooryavanshi,
रोहितने 'द बिग पिक्चर' या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने रणवीरला ही धमकी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘द बिग पिक्चर’ हा शो छोट्यापडदयावरील लोकप्रिय शोपैकी एक आहे. शोमध्ये सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. या वीकेंडला ‘दिवाळी स्पेशल’ या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीने हजेरी लावली आहे. यालेळी रोहित ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येत आहे. या चित्रपटात रणवीरचा पाहूण्या कलाकाराची भूमिका आहे. यावेळी रोहितने रणवीरला त्याचा सीन चित्रपटातून काठून टाकण्याची धमकी दिली आहे.

कलर्सने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो शेअर केला आहे. रोहित शेट्टीला एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. दरम्यान, रोहितने रणवीरकडे मदत मागितली. रणवीरने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर रोहित रणवीरला धमकी देत म्हणाला ‘चित्रपट अजुन प्रदर्शित झाला नाही…तुझा सीन कट करून टाकेन.’ त्यावर नको नको सर अशी विनंती रणवीर करू लागला.

आणखी वाचा : Sacred Games: नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडू कोसळलं, कुब्रा सैतने केला खुलासा

आणखी वाचा : आयुषमान खुराना चुकून प्यायला होता बाळासाठी काढलेले ब्रेस्ट मिल्क, पत्नी ताहिराने सांगितला ‘तो’ किस्सा

प्रोमोमध्ये कळतं आहे की ‘सूर्यवंशी’ची पोलिसाची थीम लक्षात ठेवता सर्व प्रेक्षक हे पोलिसांच्या वेषात बसले आहे. या आधी रोहितने पोलिसांवर आधारीत तीन चित्रपट होते. त्यांनी अजय देवगनसोबत ‘सिंघम’, ‘सिंघन रिटर्न्स’ आणि रणवीर सोबत ‘सिंबा’ हा चित्रपट बनवला. आता रोहित ‘सुर्यवंशी’ हा चौथा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात अक्षय आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rohit shetty threatens to cut ranveer singh s role in sooryavanshi dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या