मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमृता ही गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण यावेळी अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताने हिंदी मालिकांमधील अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केले. पण ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्याचं कारण आता समोर आलं आहे.

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले. तर या दोघांची पहिली भेट ही २००४ साली झाली होती. नेहमीच अमृता आणि हिमांशू त्या दोघांचे फोट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण या सगळ्यात अमृता तिच्या पतीपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ही फक्त अफवा असल्याचे एका रिपोर्टनुसार समोर आले आहे.

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्न बंधनात?

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता सध्या तिच्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती मुंबईत राहते आणि हिमांशू मुळात दिल्लीचा असून त्याच्या आईसोबत सध्या तिथेच राहतो. हिमांशूची दिल्लीतही काही कामं आहेत. मात्र, दोघे ही सध्या एकत्रच आहेत, असे अमृताने सांगितले.