आकस्मिक अपघातामुळे अनेकदा लोकांच्या जीवावर बेतलेल्या घटना आपण ऐकल्या असतील. कधी चुकीमुळे तर कधी आकस्मिकरित्या. पण मुंबईतल्या फिल्मसिटीत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कार स्टंटचं शूट करताना तो प्रत्यक्षच घडल्याची घटना समोर आलीय. चित्रपटाच्या शूटिंगमधल्या कारचा स्टंट करताना भयंकर अपघात घडल्याची माहिती समोर येतेय. कारचा स्टंट पाहावा अगदी तसाच अपघात प्रत्यक्षात घडलाय. अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबई फिल्मसिटीतल्या खंडाळा रोड इथे ‘द गर्ल’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. यावेळी चित्रपटातील कलाकार चित्रपटातील कार स्टंटचा एक सीनचं शूट सुरू होतं. या सीनमध्ये रस्त्याच्या दूरवरून एक कार भरधाव वेगात वर उडताना दाखवून मग खाली आदळून पडल्याचा सीन शूट करायचा होता. पण यावेळी हा सीन कलाकारांच्या डोळ्यासमोर अपघातात बदलला. जसा एखाद्या सिनेमात कारचा स्टंट पाहायला मिळतो तसाच अपघात प्रत्यक्षात घडला आहे. या सीनच्या शूटमध्ये कार पुढे काही अंतरावर थांबणं अपेक्षित होतं. पण ती कार ठरवलेल्या जागी न थांबता थेट कॅमेरा ट्रॉली आणि मग एका टेम्पोला आदळली. या अपघातात कॅमेरा असिस्टंट जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

अंगावर काटा आणणारा हा भीषण अपघात आहे. या स्टंट दरम्यानचा हा अपघात निर्माता आणि प्रॉडक्शन हाऊसच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचं बोललं जातंय. त्यांनी शूटिंग दरम्यान कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन केले गेले नाही, असा आरोप करण्यात येतोय. हा अपघात दुपारी ३ ते ४ च्या सुमारास घडला असल्याचं बोललं जातंय.

या अपघाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून आपण अंदाज लावू शकतो की हा अपघात किती भयंकर होता. दैव बलवत्तर म्हणून या अपघाता कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र यातील जखमी कॅमेरा असिस्टंचा जीव धोक्यात आहे. चित्रपटाचा स्टंट शूट करताना झालेल्या अपघाताची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेकदा बडे स्टार्स सुद्धा अशा अपघातातून बचावले आहेत.