Anand Bhosle Reacts on her Mother Asha Bhosle Death Rumours : अलीकडेच सोशल मीडियावर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरली होती. त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. याची सुरुवात शबाना शेख नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने केलेल्या पोस्टने झाली.

या पोस्टमध्ये तिने आशा भोसले यांना हार घालतानाचा फोटो असलेली बनावट नोट लिहिली होती. या नोटमध्ये आशा भोसले यांना मृत घोषित करण्यात आले. पोस्टमध्ये लिहिले होते, “प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन. एका संगीतमय युगाचा अंत (०१ जुलै २०२५).” यानंतर, अनेकांनी शबानाच्या पोस्टवर कमेंट करून दुःख व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.

आता आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ते खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ईटाइम्सला सांगितले की, “हे खोटं आहे” अलीकडेच, आशा भोसले त्यांचे पती, दिवंगत संगीतकार राहुल देव बर्मन यांची ८५ वी जयंती साजरी करताना दिसल्या.

आशा भोसले यांनी २७ जून रोजी आर. डी. बर्मन यांचे सर्वात प्रिय असलेले हार्मोनियम, याबरोबरच त्यांच्या छायाचित्राभोवती पुरस्कार आणि पदके सजवण्यात आली. आशा भोसले यांनी सुंदर पेस्टल साडी आणि त्यांच्या सिग्नेचर मोत्याचा हार घालून त्यांच्या पतीला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करण्याच्या त्यांच्या गोड आठवणींना उजाळा दिला.

आशा भोसले यांनी आयएएनएसला सांगितले की, “मला त्यांच्याबरोबर ट्यूनिंग करण्यात कधीही अडचण आली नाही. रेकॉर्डिंग करताना कधीही कोणतीही अडचण आली नाही. मी त्यांची गाणी खूप सहजपणे गायचे, पण आता जे येतील त्यांना ते कठीण जाईल. मी गायलेली गाणी ते गाऊ शकणार नाहीत.”

काही दिवसांपूर्वी आशा भोसले यांनी मुंबईत रेखा यांच्या १९८१ च्या क्लासिक चित्रपट ‘उमराव जान’ च्या प्रदर्शनाला हजेरी लावली होती, जो आता ४४ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आशा भोसले यांनी मूळ चित्रपटासाठी ‘ये क्या जगह है दोस्तों’ हे प्रतिष्ठित गाणे गायले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्क्रिनिंगच्या वेळी ९१ वर्षीय आशा भोसले यांनी पुन्हा एकदा गाणे गाण्याचा प्रयत्न केला, त्या गाणं गाताना संघर्ष करताना दिसल्या. क्षणार्धात रेखा यांनी त्यांना मागून मिठी मारली आणि त्या त्यांना आधार देताना दिसल्या. आशा यांनी विनोद केला, “मेरा गला दबा रही है”, ज्यामुळे रेखा हसल्या.