“देऊळ बंद”, “मुळशी पॅटर्न” यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटानंतर प्रविण विठ्ठल तरडे हे एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. एक व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशी त्यांची विविध रुपे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव ‘धर्मवीर’ असे आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे हे करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून चर्चेत आहे. पण चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. ते जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
Video: ‘पुष्पा’ गाण्यावरील वॉर्नरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन म्हणाला…

“धर्मवीर” चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वी निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता.चित्रपटाचे चित्रीकरण सध्या ठाणे येथे सुरू झालं आहे. आनंद दिघे यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याची आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.