scorecardresearch

जमत नाही तर घालते कशाला? अनन्या पांडे झाली कपड्यांवरून ट्रोल

अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ananya pandey, ananya pandey trolled,
अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कातर राहते. सध्या अनन्या ही तिचा आगामी चित्रपट गहरायीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, प्रमोशनचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

अनन्याचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत अनन्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. अनन्या सुंदर दिसत आहे. परंतू ती सतत तिच्या ड्रेसला नीट करण्याचा प्रयत्न करते. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

अनन्याला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “जमत नाही तर घालते कशाला?” दुसरा नेटकरी म्हणाला, “काय हे सगळं, जर कपडे नीट सांभाळता येत नाही तर घालू नकोस, तू स्वत: कपड्यांना घेऊन confident नाहीस.” तिसरा नेटकरी म्हणाला, “असे कपडे घालतेस कशाला जे खेचून खेचून मोठे करावे लागतात.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “uncomfortable वाटतं तर नीट कपडे घालायचे ना.”

आणखी वाचा : काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली….

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

अनन्या लवकरच ‘गहराइयां’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शननं केलं आहे. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ananya pandey got trolled for wear an uncomfortable dress dcp