बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्काच राहते. अनेक वेळा तिला तिच्या कपड्यांवरून आणि बारीक दिसण्यावरूण ट्रोल केले जाते. ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या आधी अनन्याला कशा प्रकारे ट्रोलिंगचा सामना करावा लागला या बद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखातीत ती म्हणाली,”मला त्या दिवशी काय तारीख होती नीट आठवत नाही. पण मी माझ्या आई-बाबांसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी मी अभिनेत्री नव्हते. मी तेव्हा सुद्धा खूप बारीक होती. जेव्हा मी व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे तेव्हा लोक माझी खिल्ली उडवत असत. ‘तू मुलांसारखी दिसतेस’. किंवा ‘तू फ्लॅटस्क्रीन आहेस’ अशा कमेंट लोक माझ्या फोटोंवर करायचे” असे अनन्या म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “या सर्व गोष्टींमुळे मला दुःख व्हायचं. कारण मी त्यावेळी मोठी होत होती. स्वतःवर प्रेम करायला शिकण्याची ती वेळ होती. त्याच वेळी लोकांनी माझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा तुम्ही मोठे होत असता आणि अशा वेळी तुमच्यावर केल्या जाणाऱ्या अशा कमेंट तुम्हाला मागे खेचत राहतात. तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. खरतरं मी आता अशा ठिकाणी पोहोचली आहे, जिथे मी सगळ्यागोष्टींना स्विकारले आहे.”
View this post on Instagram
अनन्या ‘पत्नी पत्नी और वो’मध्ये भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत दिसली होती. तर अनन्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.