बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते जॅकी दादा अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ कायमच आपल्या चाहत्यांचं मन जिंकत आलेले आहेत. त्याने आपल्या डॅशिंग लूक्सने आणि भन्नाट अंदाजाने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. आता ते एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात ते झुम्बा करताना दिसत आहे.

जॅकी श्रॉफ यांनी एका जाहिरातीसाठी झुम्बा केल्याचं दिसत आहे. यात जॅकी यांनी हिरव्या रंगाच्या टाईट्स घातल्या असून त्याला मॅचिंग असं जॅकेटही घातलं आहे. तरुण महिलांसोबत ते गाण्याच्या तालावर झुम्बा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी “अतिरिक्त झुम्बा” असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा अर्थ खूप जास्त झुम्बा असा घेता येईल.

जॅकी यांचे दीर्घकाळापासूनचे मित्र आणि सहकलाकार अनिल कपूर यांनी जॅकी यांच्या या व्हिडिओला भन्नाट रिप्लाय दिला आहे. “तुम्ही हे ऑडिशनदरम्यान कसं काय केलं?”, असा मिश्किल सवालही अनिल यांनी विचारला आहे. त्यांची ही कमेंट अनिल आणि जॅकी या दोघांच्याही चाहत्यांना बेफाट आवडलेली दिसत आहे.

जॅकी यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत. प्रेक्षक त्यांचे अभिनंदन करत आहेत. एक युजर म्हणतो, “दादा छा गये”, तर दुसरा म्हणतो, “दादा, तुम्ही कायम रॉकस्टार आहात.”

जॅकी श्रॉफ याचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ‘राधे’ या चित्रपटात ते सलमान खानसोबत दिसणार आहेत, तर ‘सुर्यवंशी’ या चित्रपटात ते अक्षय कुमारसोबत दिसतील. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतही ते एका चित्रपटात दिसणार आहेत.