Anita Hassanandani On Kissing Scene : मनोरंजन विश्वात अनेकदा कलाकारांना बोल्ड सीन करावे लागतात. प्रोफेशनचा भाग असल्याने या कलाकारांना किसिंग सीन द्यावे लागतात. पण, एका प्रसिद्ध अभिनेत्रीने किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. तिने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.

आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानीबद्दल. अनिता ही सर्वांत लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. अनिता हसनंदानी तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

२०१३ मध्ये तिने रोहित रेड्डीशी लग्न केलं. अनिता आता एका मुलाची आई आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. अनिता ‘नागिन’, ‘ये है मोहब्बतें’सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. अनिता नेहमीच तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करते. तिने प्रत्येक भूमिका पूर्ण प्रामाणिकपणे साकारली आहे.

आता अनिताने सांगितले की, ती कॅमेऱ्यासमोर किसिंग सीन करण्यास कम्फर्टेबल नाही. खरं तर, इन्स्टंट बॉलीवूडशी झालेल्या संभाषणात अनिताला विचारण्यात आले की, आई झाल्यानंतर तुम्हाला कधी अशी ऑफर आली आहे का, जी तुम्ही नाकारली? त्यावर अनिता म्हणाली, “मी कॅमेऱ्यासमोर किसिंग सीन करण्यास कम्फर्टेबल नाही. हे ऐकून बरेच लोक विचार करतील की, माझ्या पतीला यात काही अडचण असेल. पण मी पहिल्यांदाच हे स्पष्ट करू इच्छिते की, माझा पती खूप शांत आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची अडचण नाही.”

अनिता पुढे म्हणाली, “तुम्हाला विश्वास बसणार नाही की, आई झाल्यानंतर मला एक लव्ह मेकिंग सीनसाठी ऑफर आली होती. त्यांनी सांगितले की, ते तो सीन सुंदरपणे शूट करतील. पण मला एक किसिंग सीनदेखील करावे लागेल. त्यावर माझ्या पतीने सांगितले की, जर तुला कम्फर्टेबल वाटत असेल, तर तू तो करू शकतेस. रोहितला त्यात काहीच अडचण नव्हती. पण माझे म्हणणे होते की, जे मी इतक्या वर्षांपासून केले नाही. कारण- मला ते करायला आवडत नाही, ते मी आता करणार नाही. माझ्या पतीला लव्ह मेकिंग सीनमध्ये कोणतीही अडचण नसली तरी, मी स्वतः ते करण्यास कम्फर्टेबल नव्हते.” अनिताबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या ‘छोरियां चली गाव’मध्ये दिसत आहे.

स्टार प्लसवरील ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून अनिता हसनंदानी हिला खूप ओळख मिळाली. या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर, अनिताने या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली होती. आई झाल्यानंतर अनिताने पाच वर्षांसाठी कामापासून ब्रेक घेतला होता.