आधी MMS लीक झाल्याची अफवा, आता ट्रोल होतेय अंजली अरोरा; वाचा नेमकं काय घडलं

काही दिवसांपूर्वीच अंजली अरोरा व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत होती.

आधी MMS लीक झाल्याची अफवा, आता ट्रोल होतेय अंजली अरोरा; वाचा नेमकं काय घडलं
काही दिवसांपूर्वीच अंजली अरोरा व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत होती.

‘लॉकअप’ फेम अंजली अरोरा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसापूर्वीच अंजली अरोराचं ‘सैय्या दिल में आना रे’ गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पण एकीकडे गाण्याच्या यश साजरं करत असतानाच एका व्हायरल एमएमएसमुळे अंजली पुन्हा चर्चेत आली. यावर अंजलीने भावूक प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एमएमएस आपला नसल्याचं तिने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं. त्यानंतर अंजली अरोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक एमएमएस व्हायरल झाला होता. ज्यामुळे अंजली अरोराचं नाव चर्चेत आलं होतं. हा एमएमएस अंजली अरोराचा असल्याचंही बोललं जात होतं. मात्र या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अंजली नाही तर दुसरीच कोणीतरी होती. जी हुबेहूब अंजलीसारखीच दिसत होती. यावर बोलताना अंजली म्हणाली, “माहीत नाही लोक असं का करतात. याच लोकांचंही कुटुंब आहे, माझंही कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातील सगळे सदस्य माझे व्हिडीओ पाहतात. हे सर्व झाल्यानंतर त्यांनाही वाईट वाटलं असेल.”
आणखी वाचा- आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत? अकादमीने केलेलं ट्वीट चर्चेत

दरम्यान आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याचं यश तिने साजरं केलं. सोशल मीडियावर अंजलीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात ती खूप आनंदी असून केक कापताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये मस्करी करत ती म्हणते, ‘सैय्याची नजर काढा.’ तिच्या याच वक्तव्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. तिनं स्वतःच स्वतःची नजर काढण्यास सांगितल्यानं तिच्यावर सोशल मीडियावरून टीका केली जात आहे.

आणखी वाचा- “…म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला” Lock Upp मध्ये अंजली अरोराचा धक्कादायक खुलासा

अंजली अरोराच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला, ‘ओव्हर अॅक्टिंगचं दुकान’ म्हटलं आहे. याशिवाय काहींनी तर तिला झेड ग्रेड अभिनेत्री असंही संबोधलं आहे. एक युजरने तिला, “नजर का काढावी?” असा प्रतिप्रश्न देखील केला आहे. मात्र अंजली अरोरा सोशल मीडियावरून होणाऱ्या टीकेवर फारसं लक्ष देत नाही. अनेकदा ती याकडे दुर्लक्ष करताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anjali arora trolled after viral video user says overacting mrj

Next Story
‘आजोबा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतील का?’ लेकांनी विचारलेल्या प्रश्नावर जिनिलिया देशमुख म्हणते “पप्पा…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी