Ankita Lokhande Shares Emotional Post After Vicky Jain’s Accident : अलीकडेच टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि उद्योगपती विकी जैनबद्दल एक बातमी समोर आली आहे. या बातमीने अंकिता आणि विकीच्या चाहत्यांचे मन हेलावून गेले. विकी जैन सध्या रुग्णालयात दाखल आहे.

काचेचे तुकडे त्याच्या उजव्या हातात घुसले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याला ४५ टाके घालावे लागले. अंकिताचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक संदीप सिंग यांनी सांगितले की, विकी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. दरम्यान, आता अंकिताने तिचा पती विकीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

विकीबरोबरचे सुंदर फोटो केले शेअर

अंकिता लोखंडेला तिचा पती विकी जैनची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने विकीबरोबरचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. या दरम्यान, विकी आणि अंकिता दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. अंकिताने या फोटोंबरोबर एक लांबलचक नोट लिहिली आहे.

अंकिताने लिहिले, ‘माझ्या जोडीदारा, तू नेहमीच माझा हात धरला आहेस, मला नेहमीच तुझ्याबरोबर सुरक्षित वाटले आहे, तू मला नेहमी आठवण करून दिली आहे की कितीही कठीण क्षण असला तरी प्रेमच जिंकत. अगदी गंभीर परिस्थितीतही, तू मजेदार राहण्याचा आणि मला शांत करण्याचा मार्ग शोधतोस, त्यामुळेच मला घरी खूप चांगले वाटते.’

अंकिताने पुढे लिहिले, ‘लवकर ठीक हो विकी. आपण प्रत्येक वादळ, प्रत्येक लढाई, एकत्र लढू… चांगल्या आणि वाईटात, जसे आपण वचन दिले होते. तू माझी शक्ती आहेस, माझा संयम आहेस. सर्व जण प्रेम आणि प्रार्थना माझ्या विक्कीला पाठवा.” अंकिताच्या या पोस्टला चाहते खूप पसंत करत आहेत. तसेच, त्यावर कमेंट करून ते विक्कीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अंकिता आणि विकी दोघंही शेवटचे ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये दिसले. यानंतर त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं तेव्हा ते चर्चेत होते; तर आता थेट विकी रुग्णालयात असल्याचं समोर आलं आहे.