प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे यांचा ‘लोच्या झाला रे’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अंकुश, सिद्धार्थ व वैदेही यांच्यात चाललेला गोंधळ दिसून येत आहे. एकीकडे विजय पाटकर यांची जुगलबंदी तर दुसरीकडे सयाजी शिंदे व रेशम टीपणीस यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. सगळ्यांचाच हा गोंधळ आणि पळापळ कशासाठी सुरु आहे? कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे? या सगळ्याचीच उत्तरे आपल्याला ४ फेब्रुवारीला मिळणार आहेत.

‘लोच्या झाला रे’चे चित्रीकरण लंडनमध्ये झाले असून टीझरमध्ये अवघ्या लंडनची सफर घडत आहे. सुमारे एक महिना या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये पार पडले. तिथल्या सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह इतर टीमलाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते . कधी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी यामुळे कलाकारांसोबत संपूर्ण टीमला अनेक कसरती कराव्या लागल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत.