बदलणाऱ्या ट्रेंडचं खरं उगम स्थान कोणतं असा प्रश्न विचारला तर उत्तर काहीसं कठीण आहे पण अशक्य नाही. सिनेमाच्या माध्यमातून वेळोवेळी बदलणारी फॅशन त्याचं योग्य उत्तर असू शकेल. त्यामुळे नक्कीच चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना फॉलो करणारी मंडळी खूप दिसतील. बॉलीवूड, टॉंलीवूड प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आजच्या तरुणाईचे स्टाईल आयकॉन झालेत. तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीने आणखी एक स्टाईल प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. येत्या २२ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘गुरु’ सिनेमात अंकुशन वेगवेगळे शायनिंग सन ग्लासेस वापरले आहेत. त्याच्या प्रत्येक आउटफीट घातलेले शायनिंग सन ग्लासेसच्या स्टाईलला तुफान आवडत असल्याचं दिसतंय. ‘गुरु’ सिनेमात अंकुश रेखाटत असलेली व्यक्तिरेखा तरुणांना प्रचंड आवडेल यात शंका नाही. त्याने हातात घातलेल्या ब्रेसलेटमध्ये अडकवलेल्या ग्लासेसची स्टाईल लवकरच आपल्याला पाहायला मिळेल.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2015 रोजी प्रकाशित
अंकुश चौधरी स्टाईलचा ‘गुरु’
बॉलीवूड, टॉंलीवूड प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आजच्या तरुणाईचे स्टाईल आयकॉन झालेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 21-11-2015 at 16:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhary in upcoming film guru