१३ डिसेंबर १९८६ रोजी प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला जोरदार धक्का बसला होता. स्मिता पाटील यांचे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी निधन झाले. स्मिता पाटील यांच्या निधनाच्या काही महिने आधी अभिनेते अन्नू कपूर यांनी त्यांना जपून राहण्याचा सल्ला दिला होता. हे वर्ष तुमच्यासाठी खूप जड जाणार आहे, त्यामुळे काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी स्मिता पाटील यांना दिला होता.

या प्रसंगाचा उल्लेख अन्नू कपूर यांनी त्यांच्या ‘सुहाना सफर विथ अनु कपूर’ या रेडिओ शोमध्ये केला होता. त्यांनी सांगितलं होतं, “२२ जानेवारी १९८६ रोजी मी आणि दिवंगत स्मिता पाटील एका प्रोजेक्टमध्ये काम करत होतो. सत्यजित रे यांची एक मालिका असायची. त्यात मी स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका केली होती. आम्ही दोघांनी तिथे तीन दिवस शूटिंग केलं होतं.”
आणखी वाचा : ‘डस्की ब्युटी’ असलेल्या स्मिता पाटील यांच्या ‘मेकअप’मागचे रहस्य

अन्नू कपूर पुढे म्हणाले, “२६ जानेवारी १९८६ रोजी कोलकात्याहून मुंबईला परतत असताना आम्ही दोघे बसलो होतो. त्या दिवसांत मला हस्तरेषाशास्त्राची थोडी आवड होती. स्मिता मला म्हणाली की अन्नू, तू माझा हात पाहू नकोस. मी तिचा हात पाहू लागलो आणि तिला म्हणालो की कोणतीही भाग्यरेषा जीवनरेषा साथ देत नाहीये. तसेच जीवनरेखाही पुढे सरकत नाहीये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा अन्नू कपूर यांनी स्मिता पाटील यांना सांगितलं होतं, “स्मित, हे वर्ष तुझ्याठी थोडं कठीण आहे, तू जरा जपूर राहा.” त्यानंतर स्मिता पाटील यांचे काही महिन्यांनी १३ डिसेंबर रोजी निधन झाले होते. स्मिता पाटील त्यांच्या आर्ट फिल्म्ससाठी ओळखल्या जातात. त्यांना व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करण्याची अजिबात आवड नव्हती आणि अशा चित्रपटांमध्ये त्यांना अस्वस्थ वाटायचं.

आणखी वाचा : आठवणीतील स्मिता पाटील…! पाहा त्यांचे कधीही न पाहिलेले खास फोटो

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘नमक हलाल’ या चित्रपटासाठी त्यांना साइन करण्यात आलं तेव्हा त्या खूप घाबरल्या होत्या. या चित्रपटातील ‘आज रपट जाये’ या गाण्याचे चित्रीकरण करताना स्मिता पाटील अस्वस्थ झाल्या होत्या.