अभिनेता अंशुमन विचारेने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी दिली. यासोबतच त्याने एक लिंक देखली शेअर केली, यात त्याची लेक अन्वीनं बाळाला मांडीवर घेतल्याचं दिसत होतं. त्यानंतर त्याला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर आता अंशुमनची पत्नी पल्लीवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिनं हा सगळा एप्रिल फूलचा प्लॅन होता आणि त्यांना अन्वी एकच मुलगी आहे. तर त्यांना हा प्लॅन महागात पडला असे त्याच्या पत्नीने सांगितले.

पल्लीवीने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणाली, “१ एप्रिलला मी गंमत म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता. अन्वीला भाऊ झाला आहे असं सांगितलं. मात्र यानंतर अंशूला मेसेज, फोन आले. आम्ही अंशुला सांगितलं होतं की, हे एप्रिल फूल आहे म्हणून सांग. यानंतर अंशुमनला खूप कॉल, मेसेज आले त्याचा त्याला खूप त्रास होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सगळं थांबवा. आम्हाला एकच मुलगी आहे. आम्ही आधीच ठरवलं आहे की, जे काही असेल ते आपल्याला एकच असेल मग मुलगा असो किंवा मुलगी.” त्यामुळे हे सगळं थांबवण्याची विनंती पल्लवीने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

आणखी वाचा : सई ताम्हणकरला मिळाला तिचा ‘दौलतराव’? इन्स्टाग्रामवर मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : “माझ्या पतीने माझ्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत…”, अभिनेत्री मंदाना करीमीने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : “हे बोलून तुम्ही दंगली घडवत आहात”, राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंशुमनची मुलगी अन्वी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतचं अंशुमनने नवीन घर घेतलं आहे. ह्या नव्या घराची ओळख अन्वीने तिच्या युट्युबवरील व्हिडिओतून करून दिली होती. तर अंशुमन त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना नेहमीच हसवताना दिसतो. अंशुमनने फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हास्य महल, घरोघरी, कानामागून आली, या विनोदी मालिकात अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.