चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने अलीकडेच चित्रपट उद्योगातील समस्यांबद्दल भाष्य केलं. तसेच त्याने पॅन-इंडियन हिट्सच्या निर्मितीच्या ट्रेंडवरही भाष्य केलं. त्याने काही प्रादेशिक चित्रपटांच्या यशाची उदाहरणं देत त्याचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रादेशिक चित्रपट हिट झाल्यानंतर तिथल्या इतर निर्मात्यांमध्ये त्याच धाटणीचे चित्रपट बनवण्याची अघोषित स्पर्धा सुरू होते, असंही अनुराग म्हणाला. तो ‘Galatta Plus’ द्वारे आयोजित गोलमेज संवादात बोलत होता. यावेळी अनुराग कश्यपने मराठी चित्रपट ‘सैराट’ आणि अलीकडचा सुपरहिट कन्नड चित्रपट ‘कांतारा’ यांची काही मुद्द्यांवरून तुलनाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: क्लासिक इंटेरिअर, प्रशस्त हॉल अन् खिडकीतून दिसणारी मुंबई; सिद्धार्थ-मितालीने असं सजवलं त्यांच्या स्वप्नातलं घर


अनुरागने ‘कांतारा’, ‘पुष्पा: द राइज’ आणि ‘केजीएफ’ चित्रपटांसारख्या दक्षिण भारतीय हिट चित्रपटांच्या यशाबद्दलही मत व्यक्त केलं. तसेच “चित्रपट निर्माते यशातून काय शिकतात हे महत्वाचं आहे, ते एकतर त्यांना त्यांच्या कथा सांगण्याचा अधिकार देण्यात आला आहे हे किंवा त्यांना पातळी आणखी वाढवण्याची गरज आहे, या दोन गोष्टींपैकी एक शिकतील,” असं अनुराग म्हणाला. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिलंय.

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“मी नागराज मंजुळे यांच्याशी बोलत होतो आणि मी म्हणालो, ‘’सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली हे माहीत आहे का?’ म्हणजे सैराट चित्रपटाच्या यशाने चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली. कारण त्याच्या यशामुळे चित्रपटात एवढा पैसा कमावण्याची ताकद आहे. याची जाणीव लोकांना झाली. अचानक उमेश कुलकर्णी आणि इतर सर्वांनी आधी ते बनवायचे तसे चित्रपट बनवणे बंद केले, कारण सर्वांना ‘सैराट’सारखेच चित्रपट बनवायचे होते, सर्वजण सैराटचं अनुकरण करू लागले,” असंही अनुरागने नमूद केलं.


पुढे तो म्हणाला, “आता प्रत्येकजण पॅन-इंडिया चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या चित्रपटांपैकी फक्त ५% किंवा १०% चित्रपटांना यश येतं. ‘कांतारा’ किंवा ‘पुष्पा’सारखा चित्रपट तुम्हाला बाहेर जाऊन तुमची कहाणी सांगण्याचे धाडस देतो, पण ‘KGF 2’ ला कितीही मोठे यश मिळाले तरी तुम्ही प्रयत्न करून, भरमसाठ खर्च करून जेव्हा तसा प्रकल्प उभारता, तेव्हा तो आपत्तीच्या दिशेनं जाऊ लागतो. हा एक बँडवॅगन आहे, ज्याच्या माध्यमातून बॉलिवूडने स्वतःचा नाश केला.”

“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’


अमेरिकन निर्माता जेसन ब्लमचे उदाहरण देत अनुराग म्हणाला, “चित्रपटांची निर्मिती करत असताना मुख्य व्यवसाय मॉडेल बदलू नये, हे महत्त्वाचं असतं. कारण ब्लमला कमी बजेटच्या भयपटात यश आलं, परंतु त्याने त्याच्या चित्रपटांचे बजेट वाढवण्यास नकार दिला. “तो अजूनही अत्यंत नियंत्रित बजेटमध्ये चित्रपट बनवतो, सर्व बॅकएंडसह, चित्रपट यशस्वी झाल्यावर प्रत्येकाला त्यातून पैसे मिळतात आणि त्याने सातत्याने यश मिळवले आहे,” असं तो म्हणाला.

“जर ऋषभ शेट्टीने त्याच्या चित्रपट निर्मितीमध्ये मूलभूतपणे बदल केला आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवायचं, हा विचार डोळ्यासमोर ठेवून मोठ्या बजेटचे चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, तर ती खूप मोठी समस्या होईल, कारण कोणत्याही चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखाच असावा,” असंही अनुराग कश्यप म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap says sairat destroyed marathi cinema warns rishab shetty to not make mistake after kantara hrc
First published on: 09-12-2022 at 15:39 IST