दिग्दर्शक झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या आगामी चित्रपटाचा प्रसिद्धी कार्यक्रम जोरात सुरू असून आजारपणामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नसल्याने चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शर्मा व्यथित आहे. कोलकातामध्ये पार पडलेल्या ईडन गार्डनवरील आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंग, फरहान अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी ही मंडळी उपस्थित होती. यावेळी त्यांनी सामन्याचा आनंद घेत खूप धमाल-मस्ती केली. त्याचबरोबर ‘के. सी. दास’ या प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाला भेट देऊन ‘संदेश’, ‘मिष्टी दोई’ आणि ‘खीर’ इत्यादी स्वादिष्ट बंगाली मिठाईचा आस्वाद लुटला. आपल्या कुटुंबियांसाठीदेखील काही मिठाई खरेदी केली. चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान पुरुष मंडळी करीत असल्या धमाल-मस्तीत आजारपणामुळे सहभागी होता येत नसल्याने अनुष्काचे मन खट्टू झाले आहे. तसा संदेश तिने टि्वटरवर पोस्ट केला आहे. लवकर बरी होऊन सर्वांसोबतच्या धमाल-मस्तीत सहभागी होणार असल्याचा विश्वासदेखील तिने व्यक्त केला आहे. अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, शेफाली शहा, फरहान अख्तर आणि रणवीर सिंग यांच्या भूमिका असलेला झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2015 रोजी प्रकाशित
आजारी अनुष्का ‘दिल धडकने दो’च्या प्रसिद्धी कार्यक्रमापासून वंचित
दिग्दर्शक झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या आगामी चित्रपटाचा प्रसिद्धी कार्यक्रम जोरात सुरू असून आजारपणामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नसल्याने चित्रपटातील अभिनेत्री...

First published on: 25-05-2015 at 12:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma feels terrible on being sick misses fun with dil dhadakne do boys