अनुष्का शर्माचा नो मेकअप लूक व्हायरल, आईची ड्यूटी सांभाळत करतेय वर्कआउट

सध्या अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंडमधील साउथहँप्टन शहरात वेळ घालवेतेय.

anushka-sharma
(photo-indian express )

आई झाल्यापासूनच अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहे. सध्या अनुष्का पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंडमधील साउथहँप्टन शहरात वेळ घालवेतेय. इंग्लंडमधील सुंदर फोटो आणि व्हिडीओ अनुष्का तिच्या चाहत्यांसोबत शेअर करतेय. मात्र नुकताच अनुष्काने तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अनुष्काने शेअर केलेल्या फोटात तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळतोय. इंग्लंडमध्ये असतानाही मुलीचा सांभाळ करत असताना अनुष्काने स्वत:साठी वेळ काढत व्यायाम करण्यावर भर दिल्याचं दिसतंय. अनुष्काने वर्क आउटच्या वेळेचा एक सेल्फी शेअर केलाय. या फोटोवर तिने ‘स्टीलिंग वर्कआउट’ असं खास कॅप्शन दिलंय.

anushka-sharma
(photo-instagram@anushkasharma)

हे देखील वाचा: ‘खतरों के खिलाडी’ मधील स्पर्धक अनुष्का सेनला करोनाची लागण

या फोटोत अनुष्काने खास जीमचे कपडे परिधान केल्याचं दिसतंय. तर अनुष्का मास्क घालायला विसरलेली नाही हे तिचा फोटो पाहून लक्षात येत आहे. अनुष्काच्या चाहच्यांना या फोटोतील तिचा नो मेकअप लूक चांगलाच आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का शर्मा कायमच फिटनेसला महत्व देताना दिसते. गरोदरपणातही अनुष्का नियमितपणे योगा आणि व्यायाम करत होती. गरोदरपणातील अनुष्काचे वर्कआउट करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आई झाल्यानंतर देखील अनुष्काने फिटनेसकडे दूर्लक्ष केलेलं दिसतं नाही. मुलीचा सांभाळ करण्यासोबत ती वेळ काढून व्यायम करतेय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anushka sharma share workout selfie from southampton england no make up look goes viral kpw