बॉलिवूडमधील अनेक कलाकार, क्रिकेटपटू यांना मुंबईविषयी खास आकर्षण असतं. अनेकदा बॉलिवूडमधील सेलिब्रेटी रस्त्यावर शॉपिंग करताना किंवा मॉर्निंग वॉक घेतानाही दिसतात. करोना आणि लॉकडाऊन काळात मुंबईतील रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरणाऱ्या अनेक कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. नुकतंच आता आणखी एका सेलिब्रेटी जोडप्याचा मुंबईत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओत एक सेलिब्रेटी कपल चक्क मुंबईत स्कूटीवरुन फिरताना पाहायला मिळत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भय्यानी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही एका स्कूटीवरुन फिरताना दिसत आहे. त्यांना कोणीही ओळखू नये यासाठी त्यांनी हेल्मेटचा आधारही घेतल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन? कपड्यांवरही होतो लाखोंचा खर्च

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना हे सेलिब्रेटी कपल नक्की कोण असा प्रश्न पडला होता. नुकतंच त्याचं उत्तर समोर आलं आहे. मुंबईत स्कूटीवरुन बिनधास्तपणे फिरणारे हे कपल म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सोमवारी (२२ ऑगस्ट) आशिया चषकासाठी रवाना होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिका सामन्यानंतर विराट कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये सुट्ट्याही एन्जॉय केल्या होत्या. त्यानंतर आता विराट कोहली हा मुंबईत त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. नुकतंच विराट-अनुष्काचा स्कूटर चालवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अनुष्का शर्माने पार्टीसाठी परिधान केला ग्लॅमरस ड्रेस, विराट कोहली म्हणाला…

अनुष्का शर्मा पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम, विराट कोहलीसोबत रुग्णालयात जाण्याचे कारण समोर

यात विराट कोहली हा पत्नीसोबत मुंबईत फिरताना दिसत आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही मुंबईत एक शूट केल्यानंतर एकत्र फिरताना दिसले होते. त्या दोघांनीही काळ्या रंगाचे हेल्मेट घातल्याने कोणालाही त्यांना ओळखणे आले नाही. पण त्यांच्या चाहत्यांनी त्या दोघांनाही ओळखले. यावेळी विराट हा स्कूटी चालवत असून अनुष्का शर्मा ही त्याच्या मागे बसली आहे. यावेळी अनुष्काने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. तर कोहलीने हिरव्या रंगाचा टीशर्ट, काळ्या रंगाची जिन्स आणि पांढरे शूज परिधान केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विराट कोहली हा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. तर अनुष्का शर्मा ही चार वर्षांनंतर चकदा एक्सप्रेसमधून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही फार उत्सुक असल्याचे दिसत आहेत.