प्रेक्षकांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या अपूर्वाचा इन्स्टाग्रामवर बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच तिच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही एका व्हायरल पोस्टमुळे अपूर्वा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

अपूर्वानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बिर्यानी बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अपूर्वानं त्याला खूप छान कॅप्शनही दिलं आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘हृदयाचा रस्ता पोटातून जातो… बिर्याणी प्रेमी’ अपूर्वाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या माध्यमातून अभिनयाव्यतिरिक्त अपूर्वाचं आणखी एक कौशल्य समोर येत आहे.

आणखी वाचा- ‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ आला समोर! मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

अपूर्वाच्या इन्स्टाग्रामवर एक नजर टाकली तर ती उत्तम खवय्यी असल्याचं लक्षात येतं. तिला खाण्याची आवड आहेच पण यासोबतच तिला इतरांना स्वतःच्या हातचे छान छान पदार्थ खाऊ घालण्याचाही छंद आहे. ती अनेकदा तिच्या कुकिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

आणखी वाचा- The Kashmir Files वर बॉलिवूड गप्प का? विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अपूर्वाच्या कामाबद्दल बोलायचं तर ‘रात्रीस खेळ चाले मालिका’ सोडल्यानंतर अपूर्वा ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत अपूर्वा ‘राणी चेनम्मा’ यांची भूमिका साकारताना दिसली होती. त्यानंतर आता ती लवकरच ‘हास्यजत्रा’च्या मंचावर नव्या भूमिकेत दिसणार आहे. ती या मंचावर कॉमेडी करताना दिसणार आहे.