archana gautam share horrifying story related to labubu doll : सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस अगदी इंटरनेटवर एखादा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडला तरी समोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे ‘लाबुबू डॉल’. ही साधीशी बाहुली खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर लोकांच्या रांगाच रांगा लागत आहेत.
याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या बाहुल्यांचे वेड अगदी भारतापर्यंत आले. बॅग असो किंवा मोबाईल ते अगदी छोटी पर्स सगळीकडेच लाबुबू लटकलेली दिसते.
आतापर्यंत ही ‘लाबुबू डॉल’ अनेक बॉलीवूड स्टार्सबरोबर पाहिली गेली आहे, ज्याची किंमत हजारो आहे. ही ‘लाबुबू डॉल’ पहिल्यांदा टीव्ही अभिनेत्री सना मकबूलबरोबर दिसली होती, जेव्हा ती रुग्णालयात दाखल होती. त्यावेळी कोणीतरी तिला ‘लाबुबू डॉल’ भेट दिली होती. त्यानंतर तिचा फोटो समोर येताच सोशल मीडियावर चर्चा झाली.
अनन्या पांडे, करण जोहरची मुले, उर्वशी रौतेला, रश्मिका मंदाना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींबरोबर ‘लाबुबू डॉल’ दिसल्या. अनेक तरुण मुलींच्या बॅगना आता ही डॉल लटकताना दिसते. त्यासाठी मोठी रक्कमही मोजली जाते. आता बऱ्याच लोकांना त्या बाहुलीचे वेड लागले आहे आणि ते खरेदी करण्याचा विचार करत आहेत; परंतु त्यापूर्वी ‘बिग बॉस’फेम अर्चना गौतमने त्या बाहुलीशी संबंधित एक भयानक गोष्ट शेअर केली आहे. त्याबरोबरच तिने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना ती खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.
अर्चनाने सांगितला एक भयानक किस्सा
अर्चना गौतमने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिने ‘लाबुबू डॉल’शी संबंधित एक भयानक कहाणी सांगितली. अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला माहीत आहे का की, मी आताच ‘लाबुबू डॉल’बद्दल काय ऐकले, माझ्या घरी माझी मैत्रीण तुचल आली आहे. तिनं मला विचारलं की, दीदी, तू ‘लाबुबू’ आणलीस का? मी म्हणाले नाही, मी नाही आणली. तिनं मला सांगितलं की, दीदी, ती आणू नको कारण- माझ्या मैत्रिणीनं लाबुबू आणली आहे. तिचं ठरलेलं लग्न मोडलं.”
पुढे, ‘बिग बॉस’फेम म्हणाली, “त्या मुलीने लाबुबू आणताच, दुसऱ्या दिवशी तिचे वडील वारले.” त्यानंतर अर्चनाच्या शेजारी बसलेल्या मुलीने याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मित्रांनो, कृपया लाबुबू आणू नका, ही चांगली गोष्ट नाही. आधीच बनवलेले आयुष्य खराब होते. लोकांचे वडील मरत आहेत. म्हणून ती आणू नका. बिचाऱ्या त्या मुलीचे डिसेंबरमध्ये लग्न होते. तिने घरात लाबुबू आणताच तिचं ठरलेलं लग्न मोडलं. लाबुबू आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तिच्या वडिलांचे निधन झाले.” शेवटी, अर्चना म्हणाली की, देवाचे आभार! मी फ्री नव्हते म्हणून मी लोखंडवाला बाजारात गेले नाही. मी विचार करत होते की, जर मी फ्री असते, तर मी ती आणली असती. मलाही लाबुबू आणायची होती. कारण- प्रत्येक जण ते आणण्याचा ट्रेंड करीत आहेत. देवाचे आभार! लाबूबू डॉलचे तोंड इतके घाणेरडे होते की, मला माहीत नाही की, लोक ते का खरेदी करीत आहेत.”
अलीकडे, भारती सिहंचा पती हर्ष लिंबाचियाने त्याच्या एका व्लॉगमध्ये सांगितले होते की, त्यांनी एक लाबुबू डॉल खरेदी केली आहे. त्यानंतर लोकांनी जेव्हा त्याची किंमत विचारली तेव्हा हर्षने सांगितले की, त्याची किंमत ११ हजार आहे.