क्रिकेटर,पोलिटिशियन नवज्योत सिद्धू सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नवज्योत सिंग यांनी २८ सप्टेंबर रोजी पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी ट्वीट शेअर करत दिली आहे. ही बातमी कळताच सिद्धूसह बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘द कपिल शर्मा शो’ ची स्पेशल परीक्षक अर्चना पूरन सिंह देखील सोशल मीडियावर चांगल्याच ट्रेंड होतं आहेत. पूलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानाची पाठराखण केल्य बद्दल नवज्योत यांना शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. नंतर परीक्षकाच्या खुर्चीवर अर्चना पूरन सिंग यांनी रिप्लेस करण्यात आलं. मात्र शोमध्ये त्यांची जागा धोक्यात आली असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवज्योत सिद्धू यांनी राजीनाम्याची बातमी देताच सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत. ट्विटरवर नवज्योत हे पुन्हा कपिल शर्मा शोमध्ये स्पेशल परीक्षक म्हणून परतणार, अशा मिम्स ट्रेंड होतं आहेत. या मीम्सवर अर्चना यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. अर्चना सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या मीम्स त्यांनी इन्स्टावर पोस्ट केल्या आहेत. ही पोस्ट शेअर करत त्यांनी “अब इसका मै क्या करु?” असे कॅप्शन दिले आहे.

अर्चना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “अर्चनाजी तुम्हालाच बघू शकतो “. दुसऱ्या युजरने लिहिले. “त्या शोच्या खुर्चीवर आम्ही फक्त तुम्हालाचं बघू शकतो. एका एपिसोडमध्ये अर्चना यांनी सांगितलं, “सिद्धू यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर मला पुष्कळ फुलांचे पुष्पगुच्छ आणि अभिनंदनाचे मेसेज मिळाले होते”. ‘द कपिल शर्मा शो’ च्या तिसऱ्या सिझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शो मध्ये असलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.