छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीने काही दिवसांपूर्वी पत्नी नेहा स्वामीला करोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर अर्जुनने त्याची आणि त्याचा लहान मुलगा आयानची रॅपिड चाचणी करुन घेतली. दोघांचीही ही चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर अर्जुनने रॅपिड अँटिजेन चाचणी करुन घेतली. आयानची ही चाचणी पॉझिटीव्ह आली. सध्या आयान आई नेहासोबत क्वारंटाइनमध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४ ऑक्टोबर रोजी अर्जुन बिजलानीने ट्विटरवर पत्नी नेहाला करोनाची लागण झाल्याचे सांगितले. ‘माझ्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंबीय पुढचे १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहाणार आहे. तसेच आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले होते.

त्यानंतर आता अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या मुलाची रॅपिड अँटिजेन चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun bijlani little son ayaan tests positive for covid 19 avb
First published on: 07-10-2020 at 15:47 IST