बॉलिवूडमध्ये करोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबाला करोनाने विळखा घातला आहे. करीना कपूरनंतर आता बोनी कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर, अंशुला कपूर यांना करोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच अनिल कपूर यांची मुलगी रिया आणि जावई करण बुलानी यांचे करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन कपूर नुकताच त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी गेला होता. या पार्टीत मलायकाची बहीण अमृता अरोराही सहभागी झाली होती. मलायकासोबत अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील तिच्या घरी देखील ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतही अर्जुन आणि मलायकाने एकत्र हजेरी लावली होती.

त्यामुळे मलायका अरोराचीही करोना चाचणी केली जाणार आहे. याआधी वर्षभरापूर्वी त्या दोघांनाही करोनाची लागण झाली होती. दरम्यान निर्माता बोनी कपूर यांचीही तब्येत बिघडली आहे. यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे जान्हवी आणि खुशी कपूरची या दोघींचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे रिया कपूर आणि करण बुलानी हे दोघेही करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

“अभिनेत्री होण्याचे माझे स्वप्न नव्हते…”; दिशा पाटनीने केला खुलासा

दरम्यान करिष्मा कपूरने आयोजित केलेल्या या पार्टीला करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींनी हजेरी लावली होती. त्या दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. यानंतर त्या दोघीही या पार्टीत मजा-मस्ती करताना दिसत होत्या. करीना बरी झाल्यानंतर तिच्या मुलांसोबत ख्रिसमस पार्टी करताना दिसली होती. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.

“आता इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग का?” डान्सच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ट्रोल

सध्या महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. मुंबईत ओमिक्रॉन आणि करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे शूटिंगवर परिणाम होऊ लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तसेच चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor anshula rhea kapoor and karan boolani test positive for covid 19 anil kapoor and boney kapoor test negative nrp
First published on: 29-12-2021 at 15:26 IST