बॉलिवूडमध्ये सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ओळखले जातात. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही कामाच्या वेळातून वेळ काढत पॅरिसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळाले. नुकतंच अर्जुन कपूरने मलायकाच्या एका सवयीचा खुलासा केला आहे.

अर्जुन कपूर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने मलायका अरोराचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ते दोघेही एका ठिकाणी बसल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे बॅग्स, शूजचे कलेक्शन पाहायला मिळत आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने ‘शॉपहोलिकसोबत सेल्फी’ असे म्हटले आहे. त्याच्या या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत.

मुलांचा स्क्रीन टाईम कमी होण्यासाठी मराठी अभिनेत्रीने लढवली अनोखी शक्कल, म्हणाली…

सतत शॉपिंगची सवय असणाऱ्या व्यक्तींना ‘शॉपहोलिक’ म्हटले जाते. ही सवय असलेली व्यक्ती शॉपिंग न करता राहूच शकत नाही. अर्जुन कपूरने मलायकाला ‘शॉपहोलिक’ असे म्हटल्याने सर्वजण चकित झाले आहेत.

“सिनेसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार आहे पण…”, राजकुमार रावचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाला, त्यानंतर ते दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.