scorecardresearch

अर्जुन कपूरच्या नावे बॉलिवूडमधला अनोखा विक्रम

याआधी ऋषी कपूर यांचे नाव आघाडीवर होते

अर्जुन कपूरच्या नावे बॉलिवूडमधला अनोखा विक्रम
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम करुन एक नवीन विक्रम बनवला आहे.
अर्जुन कपूरने आठ सिनेमात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. आता त्याच्य आगामी सिनेमातही एक नवीन अभिनेत्रीसोबत तो काम करणार आहे. बॉलिवूडमध्ये असे फार कमी नवीन अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या अधिकतर सिनेमात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. सिनेसृष्टीत करिअरच्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केलेल्या कलाकारांमध्ये सध्या अर्जुन कपूरचे नाव अग्रस्थानी आहे.

याआधी ऋषी कपूर हे असे अभिनेते होते ज्यांनी १४ नवीन अभिनेत्रींसोबत काम केले होते. अर्जुनने ‘इश्कजादे’मध्ये परिणीती चोप्रासोबत, ‘औरंगजेब’मध्ये साशा आगा, ‘गुंडे’मध्ये प्रियांका चोप्रा ‘टू स्टेट्स’मध्ये आलिया भट्ट ‘फाइडिंग फेणी’मध्ये दीपिका पादुकोण ‘तेवर’मध्ये सोनाक्षी सिन्हा ‘कि अॅण्ड का’मध्ये करिना कपूर खानसोबत काम केले आहे. आता त्याचा आगामी सिनेमा ‘हाफ गर्लफ्रेंड’मध्येही तो एका वेगळ्या अभिनेत्रीसोबत काम करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. तर ‘मुबारकां’ या सिनेमातही तो इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टीसोबत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BN4r7sKhXUq/

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार अर्जुन आणि आलिया इतके जवळ आले होते की त्यांना एकमेकांपासून दूर राहणे कठीण झाले होते. ते एकमेकांशी बोलल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हते. अर्जुन कपूर त्याच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ सिनेमाचे चित्रीकरणासाठी तो न्यूयॉर्कला गेला होता. तिथेही तो व्हिडिओ चॅटिंगद्वारे अथियाशी बोलायचा. दोघेही रोज व्हिडिओ चॅटिंगद्वारे एकमेकांशी बोलायचे. अथियाच्या दिवसभरातील सर्व बाबींवर अर्जुन लक्ष ठेवून असतो. दोघेही मुंबईत राहत असूनही रोज एकमेकांना भेटू शकत नाहीत. पण चॅटींगच्या माध्यमातून ते संपर्कात राहत असल्याचे म्हटले जातेय. इतकेच नाही तर एका नाइट क्लबमध्ये हे दोघे एकमेकांना किस करताना दिसले होते असेही म्हटले जातेय. यात किती तथ्य आहे आणि या दोघांमध्ये खरंच काही आहे की नाही हे त्यांनाच माहीत.

अथियापूर्वी अर्जुन कपूर हा सलमानची सर्वात लहान बहीण अर्पिता शर्मा हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाला. त्यानंतर आता अर्पिताने तिचा संसार थाटला असून ती आयुष शर्मासोबत विवाहबद्ध झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2016 at 20:33 IST

संबंधित बातम्या