बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल नेहमीच त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याचं पहिलं लग्न मेहर जेसियाशी झालं होतं. मात्र तिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मागच्या काही वर्षांपासून अर्जुन रामपाल त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. एवढंच नाही तर या दोघांचा एक मुलगा देखील आहे. मात्र या दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही आणि आता अर्जुनं गॅब्रिएलाशी लग्न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांना त्याचं आयुष्य नेहमीच प्रायव्हेट ठेवायला आवडतं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती तेव्हा त्यांच्यासाठी हे सर्वात मोठं पाऊल होतं. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं गॅब्रिएलाशी लग्न करण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. याशिवाय अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत त्यानं मोठा खुलासा केला.

या मुलखतीत अर्जुनला, ‘सामाजिक दबावामुळे लग्न करण्याची गरज वाटते का?’ असा प्रश्न विचारला होता. यावर अर्जुन म्हणाला, ‘आमचं लग्न तर झालं आहे. आमची मनं एकमेकांना समर्पित आहेत. यापेक्षा जास्त काय हवं आहे. हे सर्व अधिकृत करण्यासाठी आम्हाला पेपर्सची खरंच गरज आहे का? पण आम्हाला असं अजिबात वाटत नाही. गॅब्रिएलाच्या मते लग्न हे एक सुंदर नातं आहे मात्र लग्न न केल्यानं कोणत्याही कपलमध्ये काहीच त्रुटी राहत नाहीत.’

View this post on Instagram

A post shared by Arjun Rampal (@rampal72)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला पहिल्यांदा एका जवळच्या मैत्रिणीच्या माध्यमातून भेटले होते. अर्जुननं मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. या दोघांना मायरा आणि माहिका नावाच्या दोन मुली आहेत. अर्जुन अनेकदा त्याच्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. मेहरपासून वेगळं झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे.