काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला दाक्षिणेकडील सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘अर्जुन रेड्डी.’ या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा याने मुख्य भूमिका साकारली होती. तर त्याच्या खास मित्राची भूमिका अभिनेता राहुल रामकृष्णनने वठवली. या चित्रपटाने राहुलला रातोरात स्टार केले. पण राहुल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा त्याने सोशल मीडियावर त्याच्यावर लहानपणी बलात्कार झाल्याचे म्हटल्याने सुरु झाल्या आहेत.

‘लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला होता. याबद्दल आणखी काय सांगावं हे मला कळत नाही’ असे त्याने ट्विट केले होते. त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केले आहे.

राहुलच्या या ट्विटमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी राहुलला पाठिंबा देत त्याची प्रशंसा केली आहे.

राहुलने अभिनेता अल्लु अर्जुनच्या ‘अला वैकुंटपुरम लो’ या चित्रपटात काम केले. ‘ची ला साओ’, ‘भारत अने नेनू’, ‘जयम्मू निश्चयाम्मू रा’, ‘शीशमहल’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘मिठाई’ या चित्रपटांमध्ये देखील त्याने भूमिका साकारली आहे.