terminator-450तंत्रज्ञानावर आधारित सुपरहिरो साकारणारा आणि तो गाजवणारा हॉलिवूडचा अॅक्शन हिरो अरनॉल्ड श्वार्झनेगर पुन्हा एकदा आपल्या ‘टर्मिनेटर’ अवतारात परतला आहे. १९८४ साली आलेला जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘टर्मिनेटर’ या साय-फाय पटाने लोकांवर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. या चित्रपटातून सुपरहिरो म्हणून पडद्यावर आलेला अरनॉल्डने आपला एक चाहतावर्ग निर्माण केला. ‘टर्मिनेटर’च्या या पाचव्या सिक्वलमध्ये तो पुन्हा एकदा पूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘टर्मिनेटर’च्या या नव्या आणि पाचव्या सिक्वलचे नावसुद्धा अरनॉल्डनेच ठेवले असून, ही संधी दिल्याबद्दल त्याने चित्रपटकर्त्यांचे आभार मानले आहेत. ‘टर्मिनेटर जेनेसिस’ असे या पाचव्या चित्रपटाचे नाव असून, १ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटकर्त्यांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अरनॉल्डचे वय वाढले असले, तरी त्याच्यातील स्फुर्ती आणि जोश जराही कमी झाला नसल्याचे यात पाहायला मिळते.
(छाया सौजन्य – फेसबूक)

पाहा ‘टर्मिनेटर जेनेसिस’चा ट्रेलर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.