विधानसभा अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाची खिल्ली उडवली. यावर अभिनेता आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा : “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

आरोहने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आरोह म्हणाला, “संजय राऊत यांची कॉमेंट्री अजूनही थांबतच नाहीये.” यासोबत आरोहने हसण्याचे इमोटिकॉन वापरले आहे. आरोहची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

आणखी वाचा : विमानतळावर दिसले करण जोहरच्या मुलांचे संस्कार, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. आरोहने ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्येही काम केले आहे. त्यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट, रंगभूमी यासोबतच त्याने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. त्यासोबत काही दिवसांपूर्वी आरोह हा लाडाची लेक गं या मालिकेतही झळकला होता.