बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. सुझान खान आणि हृतिक रोशनने लग्नाननंतर १४ वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान अभिनेता अर्सलन गोणीला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच अर्सलने प्रेमाची कबुली दिली आहे.
गेल्या ९ डिसेंबरला अभिनेता अर्सलन गोणीचा वाढदिवस होता. यानिमित्ताने सुझान खानने एक विशेष पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अर्सलनच्या अनेक मित्रांनी हजेरी लावली. या पार्टीदरम्यान अर्सलनचा एक मित्र मुश्ताक शेख याने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
या व्हिडीओत अर्सलन गोणी हा केक कापत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या बाजूला सुझान खान उभी असल्याचे दिसत आहे. अर्सलन केक कापत असताना ती त्याच्या मित्रांसह उभी राहून टाळ्या वाजवताना दिसत आहे. तसेच केक कापल्यानंतर तिने त्याला तो भरवल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओत सुझान आणि अर्सलन एकत्र हातात हात घालून फिरताना दिसत आहे.
83 Movie : ‘तुझे कपडे तर…’ भर कार्यक्रमात दीपिकानं उडवली रणवीरच्या ड्रेसची खिल्ली
विशेष म्हणजे अर्सलनच्या वाढदिवसानिमित्त सुझान खानने एक खास पोस्टही लिहिली आहे. यावर तिने म्हटले, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यासाठी जगातील एक इच्छा व्यक्त करते ज्यासाठी तू पात्र आहेस. आजूबाजूला हसू, हसरे चेहरे आणि फक्त प्रेम. मला आतापर्यंत भेटलेल्या सर्वात सुंदर ऊर्जांपैकी तू एक आहेस,” अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. यासोबत तिने अर्सलनसोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता.
दरम्यान सुझान खानच्या या पोस्टवर अर्सलन गोणीने कमेंट केली आहे. यावर त्याने ‘थँक्यू’, ‘लव्ह यू’ असे म्हटले आहे. सध्या त्याची ही कमेंट प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.