Arvind Kejriwal Dance Video: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता केजरीवाल शुक्रवारी, १८ एप्रिलला लग्नबंधनात अडकली. कॉलेजचा मित्र संभव जैन याच्याशी हर्षिताने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दिल्लीतील फाइव्ह स्टार शांगरी-ला इरोस हॉटेलमध्ये भव्य साखरपुड्याने या लग्नसोहळ्याची सुरुवात झाली होती. लेकीच्या साखरपुड्यात अरविंद केजरीवाल पत्नीसह थिरकताना पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, अरविंद केजरीवाल लेकीच्या साखरपुड्यात पत्नीसह ‘पुष्पा २’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘अंगारो’वर डान्स करताना दिसत आहेत. केजरीवाल हे हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल यांच्या या डान्स व्हिडीओनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

याशिवाय, सोशल मीडियावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते भांगडा करताना दिसत आहेत.

हर्षिता केजरीवाल काय करते? शिक्षण किती? जाणून घ्या…

अरविंद व सुनीता केजरीवाल यांची मोठी मुलगी हर्षिता आहे. तिने आयआयटी दिल्लीमधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. इथे तिची ओळख संभव जैनशी झाली. संभव एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंसल्टेंट म्हणून काम करत आहे. हर्षिता व संभवने मिळून ‘हेल्थ’ नावाच्या एका हेल्थकेअर स्टार्टअपची स्थापना केली आहे. हर्षिताने २०१८ मध्ये पदव्युत्तर झाल्यानंतर गुरुग्राममधील बोस्टन कंसल्टिंग ग्रुपमध्ये असोसिएट कंसल्टेंट म्हणून काम केलं आहे.

दरम्यान, हर्षिता केजरीवाल आणि संभव जैन यांच्या लग्नात अनेक दिग्गज नेत्यांनी खास हजेरी लावली होती. मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय, आदित्य ठाकरे, आशिष शेलार असे अनेक नेते मंडळी या शाही लग्नसोहळ्यात पाहायला मिळाले. तसंच पंजाबी लोकप्रिय गायक मीका सिंहने देखील हर्षिताच्या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती लावली होती.