किंग खान शाहरुख सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. पण त्याचबरोबरीने त्याच्या कुटुंबातील मंडळींचीही बी-टाऊनमध्ये चर्चा रंगते. बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या कुटुंबापैकी शाहरुखच्या कुटुंबाचाही समावेश आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाबाबत शाहरुखचा लेक आर्यन खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आर्यन बराच काळ वादाचा विषय ठरला होता. इतकंच नव्हे तर त्याने लाइमलाईट, सोशल माध्यमांपासून दूर राहण्याचं ठरवलं. बराच काळ सोशल मीडियापासून दूर राहणारा आर्यन आता पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर सक्रिय झाला आहे.
आर्यनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. आणि ही पोस्ट त्याने त्याची बहिण सुहाना खानसाठी केली आहे. सुहानाचा ‘द आर्चीज’ (The Archies) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. याचनिमित्त आर्यनने पोस्ट शेअर करत बहिणीला तिच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी मानधन? बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांनाही टाकलं मागे
आर्यनने ‘द आर्चीज’चं पोस्टर आणि टीझर शेअर करत “बेस्ट ऑफ लक बेबी सिस्टर” असं म्हटलं आहे. तसेच तिला चित्रपटासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यावरूनच आपल्या बहिणीप्रती त्याचं असणारं प्रेम अगदी स्पष्टपणे दिसून येतं. शाहरुख आणि गौरी खानने देखील आपल्या लेकीच्या नव्या वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला होता.
आणखी वाचा – “जे लोकं त्याच्यावर टीका करतात त्यांना…” तैमूरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकलं खान कुटुंबीय, व्यक्त केला राग
आर्यन ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर जवळपास महिनाभर तुरुंगात होता. आर्यनसाठी तुरुंगातील अनुभव धक्कादायक होता आणि यातून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. शाहरुखच्या कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांचे म्हणणं होतं की, तुरुंगातून परतल्यानंतरही आर्यन शॉकमध्येच होता. पण आता पुन्हा एकदा त्याने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे.