दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन लग्नानंतर ४ महिन्यातच आई- बाबा झाले आहेत. या दोघांना जुळी मुलं झाली असल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केली. त्यांच्या या बातमीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नयनतारा आणि विग्नेश यांनी कोणतेही अधिकृत निवेदन दिले नसल्याने त्यांना ही मुलं सरोगसीद्वारे झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यापलीकडे जाऊन या दोघांनी सरोगसी पद्धतीची निवड करताना त्याबाबतीत आपल्या देशात असलेल्या कायद्याचे पालन केले होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा : आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार सिक्वेल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांना याविषयी प्रश्न विचारला आला. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुब्रमण्यम म्हणाले, “या सरोगसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या व्यक्तींचे वय २१ वर्षांच्या पुढे आणि ३५ वर्षांच्या आत असेल आणि त्यांच्या घरच्यांची संमती असेल, तर कायद्याने त्यांना सरोगासीचा मार्ग स्वीकारण्यास परवानगी असते.”

सुब्रमण्यम यांनी वैद्यकीय सेवा संचालनालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. भारतात सरोगसीचा व्यवसाय करण्यावर बंदी आहे. भारतीय कायद्यानुसार सरोगेट ही विवाहित हवी आणि तिला स्वतःचे किमान एक अपत्य असावे असा नियम आहे. पण नवीन सरोगसी नियमन विधेयकाचा उद्देश हा व्यवसायिक सरोगसीवर बंदी घालणे आहे. आता सरोगेटचा वैद्यकीय शुल्क आणि विमा यांव्यतिरिक्त सरोगेट आणि पालक होऊ इच्छिणारे जोडपे इतर कोणत्याही प्रकारच्या पैशाची देवाणघेवाण भारतीय कायद्यानुसार करू शकत नाहीत.

हेही वाचा : Photos : नयनतारा-विग्नेशचं शून्य रुपयांत हनिमून; एका दिवसाचे अडीच लाख भाडे असलेल्या स्पेनमधील हॉटेलचा खर्च कोण करत आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी ९ जूनला थाटामाटात लग्न केलं होतं. लग्नानंतर केवळ ४ महिन्यांनतर नयनतारा आणि विग्नेश यांच्या घरात छोट्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर त्यांनी याची माहिती देत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. परंतु नयनतारा सरोगासीमार्फत आई झाली असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात या दोघांना चौकशीला समोरे जावे लागू शकते.